दिलासादायक | सोलापुरात आज कोरोनामुक्त 126 तर पॉझिटिव्ह 44 ; एकही मृत्यू नाही

0

MH 13 News Network
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज मंगळवारी दुपारी दिलेल्या माहितीनुसार २८७ वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी २४३ अहवाल निगेटिव्ह आले असून ४४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात २४ पुरुष तर २०महिलांचा समावेश नसल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज १२६ बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.दिलासादायक बाब म्हणजे आज एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे .

आज पर्यंत एकूण 367 जणांचा बळी या आजाराने गेला आहे यामध्ये 242 पुरुष तर 125 महिलांचा समावेश होतो.

आज या भागातील रुग्ण आढळले…
नवी पेठ परिसरातील एक महिला, मुस्लिम कब्रस्तान जवळ- सिद्धेश्वर मंदिर जवळ एक पुरुष, मजरेवाडी येथील दोन महिला- तीन पुरुष ,स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती दोन महिला- तीन पुरुष, हराळे नगर -कुमठा रोड एक पुरुष, तीन महिला. भवानी पेठ एक पुरुष ,विष्णुनगर- स्वागत नगर एक पुरुष, रेवणसिद्धेश्वर नगर, होटगी रोड एक पुरुष, कृष्णा वसाहत विडी घरकुल एक पुरुष, शिक्षक सोसायटी दक्षिण सदर बाजार एक महिला, एक पुरुष ,मुरारजी पेठ एक पुरुष, झुरले नगर-सोलापूर एक महिला ,सलगर वस्ती- देगाव एक महिला, मौलाना चौक नई जिंदगी एक महिला,रवींद्र नगर, आकाशवाणी केंद्र जवळ दोन पुरुष -दोन महिला, प्रताप नगर विजापूर रोड १ पुरुष, विजया हौसिंग सोसायटी कुमठे गाव एक पुरुष, आंबेडकर नगर होटगी रोड एक पुरुष, गंगाई केकडे नगर मुळेगाव रोड एक महिला ,कोटा नगर राघवेंद्र मंदिराजवळ एक महिला, रंगराज नगर जुना विडी घरकुल एक महिला, मल्लीकार्जून नगर अक्कलकोट रोड एक पुरुष, मुस्लिम पाच्छा पेठ एक पुरूष, न्यू लक्ष्मी चाळ एक महिला, राजीव गांधीनगर एक पुरुष ,ज्ञानेश्वर नगर विजापूर रोड एक महिला ,थोबडे वस्ती देगाव नाका एक पुरुष, समर्थ नगर सोलापूर एक पुरुष तर संतोष नगर जुळे सोलापूर येथील एक महिला पॉझिटिव्ह असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 5190 इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 367 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1445 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 3378 इतकी लक्षणीय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here