Solapur Accident भीषण अपघात | माजी सरपंचासह ड्रायव्हरचा जागीच मृत्यू ; एकूण चार जण ठार

0

MH 13 News Network

एसटी आणि fortunar या गाडीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे.या अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह तीनजण जागीच ठार झाले. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याणच्या जवळपास घडल्याचे समजते. यात चिदानंद सुरवसे यांचा ड्रायव्हर काळे याचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मृत चिदानंद सुरवसे (वय 47) यांची फॉर्च्यूनर गाडी एम एच 13 सी एस 3330 ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक के ए 22 एफ 2198 ला धडक झाल्यानंतर पलटी होऊन चक्काचूर झाल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले आहेत. सुरवसे यांच्यासोबत पवार, वाहन चालक काळे यांच्यासह एकजण होता, त्याचे नाव अद्याप ही समोर आलेली नाहीत. दरम्यान या चारी मृतदेहांना विजयपूर मधील शासकीय हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, विरोधी पक्ष नेते अमोल शिंदे तातडीने घटनास्थळी निघाले आहेत.त्याच सोबत सुरवसे यांचे कुटुंबीय ताबडतोब विजयपूर कडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचे ते अनेक वर्षे सरपंचपदी त्यांनी कार्यभार पाहिला.

सोलापुरातील अनेक दिग्गज राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्यासोबत त्यांचा परिचय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here