By-MH13 NEWS,वेब/टीम
सामाजिक कार्य करणाऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे. त्यामुळे आनंद व प्रेरणा मिळते. माणूसकी हरवत चालली आहे. तेव्हा माणुसकी आणि नात्यातील ओलावा जपण्याची गरज आहे. सामाजिक कर्तव्याचे पालन सर्वांनी केले पाहिजे असे आवाहन सीआयडीचे सहाय्यक आयुक्त दीपक आर्वे यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रंगभवन समोरील समाजकल्याण केंद्रात उत्साहात पार पडला. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी रुपाली कोळी, सोलापूर महानगरपालिकाचे मुख्य लेखापरीक्षक अजय पवार , उद्योजक श्रीपाल कोठारी , मोशन फिल्म स्टुडिओचे सचिन जगताप , श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
सहायक आयुक्त आर्वे पुढे म्हणाले , श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्या कार्यात माणूसकीचे जीवंत दर्शन घडते. व्हाट्सएप व फेसबुकमुळे संवाद कमी होत आहे. नात्यातील ओलावा कमी झाला आहे. आपण आपले मूलभूत हक्क जाणतो पण कर्तव्ये जाणीवपूर्वक विसरतो अशी खंत व्यक्त करतानाच त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य न विसरता पार पाडले पाहिजे असे आवाहन केले.
मुख्य लेखा परिक्षक पवार म्हणाले , विविध कार्यक्रमात उल्लेखनिय कार्याची ओळख होते. सत्कार्यामुळे प्रेरणा मिळते. व्यक्तीगत, सामाजिक व शहर विकासासाठी सुसंवाद महत्वाचा आहे असे सांगून प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले.
युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. स्व. कांतीलाल भैरूलाल कोठारी यांच्या स्मरणार्थ कोठारी परिवाराचे कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले. प्रास्ताविक भाषणात संस्थापक कासट यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली तळवार यांनी केले. तर आभार मयूर गवते यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीला तापडिया, अश्विनी राठोड, संजय हादरापुरे, शुभम कासट, ऋषिकेश कासट, शंकर बडगर, प्रशांत हिबारे, सचिन हुंडेकरी, शुभम हंचाटे, दिपक भोसले, प्रविण कदम, मयुर गवते, साहेबराव परबत, शीपाद सुत्रावे, नरसिंह लकडे, विजय छाचुरे,जगदीश पाटील, श्रीकांत प्रधान, विश्वनाथ वाघमारे, दिपक बुलबुले, विक्रम बायस, प्रकाश जाधव आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
प्राचार्या रुपाली हजारे (नागेश करजगी ऑर्चिड स्कूल), आर.जे.पल्लवी नाईक (बिग.एफ.एम. ९२.७), उद्योजक मयुर दरगड, उद्योजक बालाजी शालगर (मफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड), शिक्षक गणेश माने (बीन भिंतीची शाळा उपक्रम), कर्मचारी राहुल बिराजदार (जिल्हा न्यायालय ) आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.