यमाईदेवी आश्रमशाळेत श्री “सिद्धेश्वर यात्रा मिरवणूक”
एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र…
सोलापूर, दि. 12-
एकदा भक्त लिंग हर्र बोला हर्र…, श्री सिद्धेश्वर महाराज की जय.. , अशा जयघोषणा देत गुरुवारी सकाळी मार्डी येथील संत रविदास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री यमाईदेवी आश्रम शाळेतील विध्यार्थ्याची नंदीध्वज, पालखीसह वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत विध्यार्थी बारबंदी वेशात सहभागी होते. अग्रभागी भगवा ध्वज, त्यानंतर मानकरी हिरेहब्बू, श्री सिद्धेश्वर महाराजांची पालखी, त्यानंतर मानाचे सात नंदीध्वज, त्यामागे मुला-मुलीचे झांज व लेझीम पथक असा लवाजमा होता.
उदयोजक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते श्री च्या पालखीचे पूजन करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ. सुरेखा लांबतुरे, संस्थापक अशोक लांबतुरे, सचिव मधुकर गवळी, संचालक शंकर जाधव, मुख्याध्यापिका सौ. रुक्मिणी लांबतुरे, शिक्षिका सौ. संगीता व्हनकोळे, सौ. विद्या हराळे, शिक्षक लोखंडे, स्वामी, करे,कोळेकर,देशमुख, तुळजापूरे, गवळी, चव्हाण, आदी उपस्थित होते.