‘पत’ निर्मिती केंद्र | श्री समर्थ महिला सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात

0

श्री समर्थ महिला सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
समर्थ पतसंस्थेचे उद्घाटन सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या वेळी अध्यक्षस्थानी हभप सुधाकर महाराज इंगळे हे होते. प्रमुख उपस्थिती सौ. वैशाली कडूकर , पाेलिस उपआयुक्त सोलापूर शहर व भाग्यश्री बिले-कसगावडे जिल्हा क्रीडाधिकारी उस्मानाबाद ह्या होत्या.उपस्थित मान्यवरांचे व सभासदांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष नीता दिनकर देशमुख यांनी केले. प्रास्ताविक मध्ये संस्था स्थापन करण्यामागील महिलांचा उद्देश दिनकर देशमुख यांनी विषद केला.

यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी या पतसंस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी चांगले काम सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये होईल असे गौरवोद्गार काढले.सौ भाग्यश्री बिले कसगावडे यांनी पतसंस्थेची भूमिका व सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या .पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी महिला ह्या पूर्वीपासून जी छोटी छोटी बचत घरामध्ये करतात तर आता त्यांनी यापुढे पतसंस्थेचे माध्यमातून पत निर्माण करून सक्षम होण्यासाठी भर द्यावा असे मनोगत व्यक्त केले व पतसंस्थेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .

आपल्या अध्यक्षीय भाषणात ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी पुरुषांच्या सक्षमीकरणासाठी महिला एकत्र येऊन महिला पतसंस्था काढून पुरूषांच्या मागं उभा आहेत असे मनोगत व्यक्त केले. प्रत्येक पुरूषाला व्यवसाय करत असताना अर्थकारणाची गरज असते व त्यासाठी त्यांना पत असेल तरच ती मदत पूर्ण होते .तर अशी ही पत तयार करण्याचे केंद्र म्हणजे पतसंस्था आणि पत या शब्दाचा उलटा अर्थ केला तर तप होते जेवढ तप जास्त तेवढी पत जास्त असे मनोगत व्यक्त केले.

.
समर्थ पतसंस्थेचा  दिमाखदार उद्घाटन सोहळा उत्साहात आणि आनंदात पार पडला .यावेळी पतसंस्थेचे अनेक सभासद तसेच नगरसेवक आनंददादा चंदनशिवे ,नगरसेवक गणेश पुजारी , विरोधीपक्ष नेते अमोल बापू शिंदे, शहर काँग्रेसचे युवा नेते नगरसेवक चार्टर्ड अकाऊंटंट विनोदभोसले, सोलापूर शहर युवक काँग्रेस सचिव सागरजी शहा, शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे, गणेश दादा वानकर, दत्ता पंत वानकर,हरिभाऊ चौगुले,पंढरपूर भाजप तालुकाध्यक्ष भास्कर दादा कसगावडे,अनंत महाराज इंगळे, नागनाथ महाराज पाटील, अण्णासाहेब पाटील, सुधाकर कसगावडे, डाळिंबरत्न दत्तामामा भोसले, पुणे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, सुरेश शहापूरकर , रमेश भोसले,विलास कोरे,संतोष भोसले, बापू साठे प्रमोद यादव, संजय साळुंखे,सिद्धराम हंगरगी,प्रदीप रूपनर पत्रकार शिवाजी सुरवसे, विजय जाधव, महावीर जाधव, प्रवीण नन्नवरे,राधाकृष्ण कॉलनी मित्रपरिवार व शिवप्रेमी ग्रुप बीबीदारफळ , रवी म्हस्के, अविनाश कुलकर्णी ,जगदीश भोसले,राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोळगे’ राजेंद्र हजारे ,मानाजी बापू माने व राजकीय, सामाजिक बँकिंग क्षेत्रातील मान्यावरांसोबतच सर्व संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .आभार प्रदर्शन डॉ मंजुषा नन्नवरे यांनी केले,सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here