धक्कादायक :संचारबंदी असताना सामूहिक नमाज कार्यक्रम ,45 ते 60 लोक पोलिसांच्या ताब्यात

0

MH13 NEWS Network

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना सोलापूरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामूहिक नमाज पठण करणाऱ्या 45 ते 60 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एमआयडीसी पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली आहे. जोडभावी पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या मशिदीत जवळपास 50 ते 60 लोक धार्मिक प्रार्थनेसाठी एकत्र आले होते.आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ताब्यात घेतलेल्या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


एकीकडे कोरोनाच्या महामारी चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन लोकांनी एकत्र येऊ नये, खबरदारी घ्यावी असे वारंवार आवाहन करत आहे. तर दुसरीकडे अशा पद्धतीने संचारबंदी मोडून एकत्र येणाऱ्या लोकांमुळे कायद्याचे उल्लंघन केले जात आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here