सोलापूर | शिवछत्रपती जयंती प्रशालेत उत्साहात साजरी

0

दि.१९फेब्रुवारी शिवजयंतीचे औचित्य साधून शहरातील विविध ठिकाणी शासनाचे नियम पाळून शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
तुळशीदासनगर,बाळे येथील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बाळे येथील ज.रा.चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,इंदिरा प्रशाला,राजीव प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व संत तुकाराम महाराज यांच्याही पुतळ्यास संस्थेच्या अध्यक्षा,माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षा ठोकळ यांनीआपले मनोगत व्यक्त केले.चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास व महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण जगाला एक आदर्श घालून दिला.महाराजांची राजनीती, कुटनीती आजही जगामध्ये आपणास पाहण्यास मिळते.स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराजांचा आदर्श डोळयांसमोर ठेवूनच इंग्रजांना स्वातंत्र्य सैनिकांनी नमविले व स्वातंत्र्य मिळविले हे त्यांनी सांगितले. यावेळी विविध शाखांतील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here