यंदा शिवजयंती साजरी होणार साध्या पध्दतीने; असं केलं आवाहन

0
  • शासनाच्या निर्देशामुळे माढ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीला परवानगी नसल्याने आरोग्य विषयक उपक्रम राबवावे -अमुल कादबाने

शेखर म्हेञे/माढा प्रतिनिधी : शासनाने याआधी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 फेब्रुवारी पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केल्याने व राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढ होत असल्याच्या अनुषंगाने यंदाची शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर माढा पोलीस स्टेशन मध्ये शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक माढा पोलीस स्टेशनमध्ये आयोजित केली होती.

यावेळी शासनाच्या नियमावलीचे पत्रक पदाधिकाऱ्यांना वाचून दाखवण्यात आले व त्या संर्दभात मार्गदर्शन केले. यावेळी जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुकीला परवानगी नसल्याने जयंती काळात आरोग्य विषयी उपक्रम राबविण्यात यावे. असे आवाहन माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांनी केले. यावेळी शासनाच्या नियमाचे पालन करत मास्क, सॅनिटायझर, व सोशल डिस्टंसिंगचा अवलंब करावा.नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलिस नाईक पाडुंरंग देशमुख, माढा व परिसरातील शिवजन्मोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळेस छञपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे.गृहविभागाने दिलेल्या नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव मंडळांनी सहकार्य करावे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीला परवानगी नसल्याने आरोग्य विषयक उपक्रम राबवावे.

अमुल कादबाने
सहाय्यक पोलिस निरीक्षक माढा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here