‘तो’ ऑडिओ झाला Viral | तर..मरीआई चौक ओलांडून दाखवा ; शिवसेना ×भाजप

0

महेश हणमे /9890440480

ब्रेकिंग | तर..मरीआई चौक ओलांडून दाखवा – शिवसेना × भाजप

आज बुधवारी दुपारी सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या गेट समोर भाजपाचे ओबीसी आरक्षण संदर्भात आंदोलन झाले.या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केला. यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी संतप्त आणि तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुकतेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरुद्ध शिवराळ भाषेत टीका केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे हे प्रसिद्धीच्या झोतात आलेले आहेत. राज्यभर त्यांनी केलेल्या टीकेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

आज बुधवारी रात्री भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना फोन वरून उंटाच्या××× मुका घेऊ नका, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पद यापेक्षा उद्धव ठाकरे यांना आम्ही दैवत मानतो .तुम्ही सोलापुरात येऊन आमच्या दैवताचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. त्याला तुमच्या गावात येऊन उत्तर देऊ अशा स्वरूपाची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. तर शहरात असलेले मरीआई चौक ओलांडून दाखवा असा धमकीवजा इशारा पुरुषोत्तम बरडे यांनी जिल्हाध्यक्ष देशमुख यांना दिल्याचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

यासंदर्भात mh13 न्यूज च्या विशेष प्रतिनिधीने सेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांना संपर्क साधला असता त्यांनी उद्धव ठाकरे आमचे दैवत आहे. त्यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास त्याची गय केली जाणार नाही भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. वेळप्रसंगी त्यांच्या गावात जाऊन सेना स्टाईलने आंदोलन करू. ज्यांना हेडगेवार आणि हेगडेवार याच्यातील फरक कळत नाही त्यांनी आंदोलनाचे शहाणपण करू नये असा टोला लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here