राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्याध्यक्ष संजय पारवे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संजय पारवे मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली.
सोलापुरात विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राष्ट्रीय छावा संघटनेचे कार्याध्यक्ष तथा श्री न्यानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान चे आधारस्तंभ संजय पारवे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हिंदू रक्षक युवा प्रतिष्ठान, शिवधनुष्य प्रतिष्ठान, श्री ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
अक्कलकोट रोड वरील ज्ञानेश्वर नगर परिसरात वृक्षारोपण, गरजूंना मिठाई वाटप,फळे वाटप करण्यात येणार आहे.