छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्सव नियोजन बैठक

0
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त उत्सव नियोजनासाठी बैठक
  • संदीप फाऊंडेशनचे सोलापूरकरांना आवाहन

प्रतिनिधी/सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सोलापूरमध्ये यंदाच्या वर्षी संदीप फाऊंडेशन तर्फे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक संदीप दुगाणे यांनी दिली आहे.

रविवारी 1 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता शिवस्मारक सभागृह येथील प्रांगणामध्ये संदीप फाउंडेशनची वार्षिक बैठक व नूतन पदाधिकारी निवड होणार असल्याची माहिती अध्यक्ष संजय कोडगले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. याच वेळी उत्सव नियोजनासाठी सोलापूरकरांनी आपापल्या सूचना द्याव्यात असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये संदीप फाउंडेशनचा मोठा सहभाग असतो. रक्तदान शिबिर, अन्नदान, गरजूंसाठी ऑक्सिजन पुरवठा, वृक्षारोपण, महापुरुषांच्या जयंती निमित्त पुस्तकांचे वाटप,मिठाई वाटप असे अनेक उपक्रम यापूर्वी राबवण्यात आले होते. यंदाच्या वर्षी सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध उपक्रमाने भव्य दिव्य स्वरूपात सादर करण्याचा फाउंडेशनचा मानस असल्याचे मुख्य मार्गदर्शक करण दुगाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here