१०८ सामुहिक सुर्यनमस्कार घालून युवक-युवतींनी केले नववर्षाचे स्वागत

तरुणांनी जास्तीत जास्त वेळ राष्ट्रकार्यासाठी द्यावा : विश्वास लापालकर

1

By-एम एच१३न्यूज नेटवर्क

विवेकानंद केंद्राचे युवा नेतृत्त्व विकसन शिबीर हे युवकांनी संकल्प करण्यासाठीचे शिबीर आहे. आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ राष्ट्रकार्यासाठी देण्याचा संकल्प या चारदिवसीय शिबिरात आलेल्या युवक युवतींनी करावा असे आवाहन विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत संघटक विश्वास लापालकर यांनी केले. चार दिवसीय युवा नेतृत्त्व विकसन शिबीराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. विवेकानंद केंद्राचे प्रांत प्रमुख अभय बापट, जीवनव्रती कार्यकर्त्या सुजाता दळवी, सुजाता पिंगळे, प्रवीण दाभोळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शिबिराच्या प्रथम सत्रात केंद्राचे केंद्राचे सह महासचिव प्रवीण दाभोळकर यांनी युवकांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी त्या क्षेत्राला आपला धर्म मानून कार्य केले पाहिजे. विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथजी रानडे यांनीही केंद्र कार्याच्या माध्यमातून मनुष्यनिर्माणाच्या कार्याला आपला धर्म मानून कार्य केले. त्यामुळे आज विवेकानंद केंद्राच्या आठशेहून अधिक शाखा देशभरात सुरु आहेत. लोक मला लोहपुरुष म्हणतात मात्र एकनाथजी रानडे हे पोलादी पुरुष आहेत असे गौरवोद्गार सरदार वल्लभभाई पटेल यांनी काढल्याची आठवण त्यांनी युवकांना सांगितली.


पाचशेहून अधिक युवक युवतींनी घातले १०८ सुर्यनमस्कार

– एकीकडे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाई डीजेच्या तालावर धुंद होऊन नाचतानाचे दृष्य आपण दरवर्षी पाहतो मात्र सोलापुरात काही वेगळेच चित्र पहायला मिळाले आहे… युवा नेतृत्त्व विकसन शिबिरात राज्यभरातून सोलापुरात आलेल्या पाचशेहून अधिक युवक युवतींनी सामूहिकपणे १०८ सुर्यनमस्कार घालत नवीन वर्षाचे स्वागत केले. विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या सोलापूर शाखेने आयोजित केलेल्या युवा नेतृत्त्व विकसन शिबीरात राज्यभरातील तरुणांनी सहभाग नोंदवला. चार दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या शिबीरात डिक्कीचे प्रमुख मिलिंद कांबळे, अभिनेते राहुल सोलापूरकर, डॉ. राजेंद्र भारुड, बेळगावचे उद्योजक संजय कुलकर्णी आदींनी तरुणांना मार्गदर्शन केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here