Breaking | ‘या’ तालुक्यातील सलून व गॅरेज राहणार ‘लॉकडाऊन’

0

शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी 

माढा तालुक्यासह माढा शहरात कोरोना विषाणूचा विळखा वाढला आहे . माढा शहरात काल एकाच दिवसात 14 रूग्ण आढळून आल्याने माढा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही रूग्ण वाढ माढा शहरासाठी चिंतेची गोष्ट आहे. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व माढा शहरातील कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी माढ्यातील मेकॅनिकल असोसिएशन व माढा नाभिक संघटनेच्या वतीने उद्या रविवार पासून 8 दिवसाचे कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्वतःहून आपली दुकाने बंद केल्याने या दोन्ही संघटनेचे शहरातील नागरिकांमधून त्यांच्या मोठे पणाचे कौतुक होत आहे .

आम्हाला आमच्या व्यवसायापेक्षा व पैशापेक्षा माढा शहराची सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे आम्ही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 2/8/2020 ते 9/8/2020 या कालावधीत 8 दिवस सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अनिल साळुंखे
नाभिक संघटना अध्यक्ष माढा.

कोरोना विषाणूचा माढा शहरातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेकॅनिकल असोसिएशनचा उद्या रविवार ते रविवार असे 8दिवसाचा बंद एकमताने मंजूर झाला आहे.माढा शहरातील सर्व टू व्हीलर मेकॅनिकल गॅरेज 8 दिवस बंद असतील.
भारत अधटराव & अतुल घोलप. अध्यक्ष & उपाध्यक्ष मेकॅनिकल असोसिएशन माढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here