साकव फौंडेशनच्या उत्सव दानाचा सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनाचे उदघाटन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते
शहर /प्रतिनिधी
दि ३- सोलापूरकरानी सामाजिक संस्थांच्या प्रदर्शनाला भेट देऊन सामाजिक ऋण फेडण्याचे आवाहन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.
सोलापूर येथील साकव फाउंडेशन च्या वतीने सामाजिक संस्था च्या प्रदर्शनाचे आयोजन दोन दिवस निर्मलकुमार फडकुले सभागृहात करण्यात आले आहे त्याचे उदघाटन पदश्री गिरीश प्रभुणे, सहायक पोलिस आयुक्त दीपक आरवे, जगदीश पाटील आदी उवस्थित होते.
अन्नदान, ज्ञानदान यातून सामाजिक सक्षमीकरण शक्य असून या माध्यमातून सामाजिक स्तर उंचावण्यास मदत होइल.
सोलापूर येथील सामाजिक संस्थचे कार्य कृतिशील असून यास दानशूरांचे हातभार लावल्यास गतिशील होईल असे मत गिरीश प्रभुणे यांनी नमूद केले.
सहायक पोलिस आयुक्त दीपक आरवे यांनी वाढदिवस वगैरे ईथुन पुढ सामाजिक संस्थासोबत साजरे करण्याचा निश्चय केला.
नागरिकांनी भेट द्यावी…
सदर प्रदर्शनास भेट देऊन पुस्तक कपडे आर्थिक अश्या कोणत्याही स्वरूपात मदत करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
वि एक्स एल , सारथी, संस्कार संजीवनी, संभव, क्रांती महिला संघ, जयहिंद फूड बँक, प्रार्थना फौंडेशन व नेचर काँजेर्वेशन आदी संस्थांचा समावेश आहे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केले तर प्रास्ताविक व आभार जगदीश पाटील यांनी केले