कोरोनामुक्त 8114 | आज बरे झाले 272 तर 308 ‘पॉझिटिव्ह’ ; 6 जणांचा मृत्यू

0

MH13 News Network 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज सोमवारी ग्रामीण भागातील तब्बल 308  जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 191  पुरुष तर 117  महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 272  आहे. आज 6  जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 2487 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2179 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 11  हजार 521 इतकी झाली आहे. यामध्ये 7  हजार 37  पुरुष तर 4 हजार 484  महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 330  जणांचा मृत्यू झाला आहे यात 228  पुरुष तर 102 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3  हजार 77  आहे .यामध्ये 2  हजार 16  पुरुष तर 1061 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 8  हजार 114  यामध्ये 4793   पुरुष तर 3321  महिलांचा समावेश होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here