बाणेगाव,मार्डी,मोहोळ,पंढरपूर,अक्कलकोट ; 17 नवे कोरोना रुग्ण

0

MH13 News Network

ग्रामीण भागात नव्याने 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे दिसून येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज मंगळवारी 17 ने वाढली आहे. यामध्ये 14 पुरुष तर  तीन महिलांचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .आज रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या बारा इतकी आहे. यात आठ पुरुष तर चार  महिलांचा समावेश होतो.
आज बाणेगाव ,तालुका उत्तर सोलापूर मधील 1 पुरुष ,तिर्हे ता.उत्तर सोलापूर मधील 2 पुरुष , मार्डी तालुका उत्तर सोलापूर एक पुरुष,  गताडे प्लॉट,पंढरपूर 1 पुरूष,भक्त निवास,पंढरपूर 1 पुरुष, रुक्मिणी नगर पंढरपूर एक पुरुष ,घोडके गल्ली पंढरपूर 1 पुरुष, औदुंबर पाटील नगर पंढरपूर एक पुरुष ,नवी पेठ पंढरपूर एक पुरुष ,जुनी पेठ पंढरपूर एक पुरुष, मोहोळ मधील क्रांतीनगर भागातील एक पुरुष, मेहबूब नगर, एक महिला, नागनाथ गल्ली ,एक महिला तर जेऊर वाडी तालुका अक्कलकोट येथील एक पुरुष,  बोरगाव (दे )तालुका अक्कलकोट येथील एक पुरुष  बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 361 इतकी झाली आहे तर, आज पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे ग्रामीण भागातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 202 आहे तर आज पर्यंत रुग्णालयातून बरी होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 142 आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here