सोलापूरकरिता अशा मनोरंजनाचे प्रदर्शन वारंवार व्हायला पाहिजेत – कुमार करजगी

बच्चे कंपनीच्या बनतेय आवडीचं

0
By-MH13News, नेटवर्क
सोलापूर – सोलापुरात वारंवार बालगोपाळांसाठी अश्या रोबोटिक ॲनिमल प्रदर्शन व्हायला पाहिजेत जेणेकरून सोलापुरातील बालगोपाल याचा मनसोक्त आनंद घेतील आणि एक वेगळेपण सोलापूरचा सिद्ध होईल असे प्रतिपादन कुमार करजगी यांनी केले आहे.
              ते जुनी मिल कंपाऊंड येथील रोबोटिक ॲनिमल प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते यावेळी प्रदर्शन चे मालक एम एस नागचंद्रप्पा, प्रदर्शन कॉर्डिनेटर म्हणून रामनाथ तसेच समर्थ ॲड्सचे संतोष उदगिरी उपस्थित होते.
               रोबोटिक ॲनिमल प्रदर्शनमध्ये वाघ ,सिंह, हत्ती घोडा, डायनासोर ,हरिण ,पांडा असे वेगवेगळ्या प्राणी रोबोट प्राणी उपलब्ध असून आपण प्राण्यां समोर उभा राहिले की त्याचा संसार सुरू होतो आणि त्या प्राण्याचा आवाज सर्वत्र ऐकू यायला लागतो यामुळे मुलं खूप आनंदित आणि उत्साहीत होतात.
         सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या लहान मुलांसह या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावे असे आवाहन एम एस नागचंद्रप्पा यांनी केले आहे. हे प्रदर्शन  30 ऑगस्ट पासून ते 8 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे चाळीस दिवस चालणार असून यामध्ये ते विविध फुड स्टॉल्स, शॉपिंग स्टॉल्स, विविध खेळ खेळण्या उपलब्ध असून येथे खाण्याचा आस्वाद घेता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here