रोडकरी | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात दाखल ; हजारो कोटींच्या प्रकल्पाचे होणार लोकार्पण

0

रोडकरी | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोलापुरात दाखल ; हजारो कोटींच्या प्रकल्पाचे होणार लोकार्पण

सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आज रविवारी सायंकाळी सोलापुरात दाखल झाले आहेत.

सोमवार दि. 25 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजता सोलापूर येथे विजापूर रोडवरील नेहरूनगर परिसरातील शासकीय क्रीडांगणावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 8181 कोटी रुपये किंमतीच्या व 292 किमी लांबीच्या 10 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शनिवारी सायंकाळी सोलापूर विमानतळावर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे आगमन झाले. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख,अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अन्य मान्यवरांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे स्वागत केले.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी या सुद्धा सोलापुरात आल्या आहेत. बालाजी सरोवर हॉटेल या ठिकाणी त्यांचा मुक्काम असणार आहे.

आज शनिवारी रात्री भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक होणार आहे. तसेच सोलापुरातील गारमेंट उद्योजकांसोबतही चर्चा करणार आहेत. रात्रीचे जेवण आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे करणार आहेत.

सोमवारी सकाळी 9.30 वाजता नेहरूनगर शासकीय क्रीडांगणावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कार्यक्रम होईल. 11.45 वाजता नितीन गडकरी हेलिकॉप्टरने अक्कलकोटकडे रवाना होतील. स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन गडकरी आणि त्यांच्या पत्नी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी भेट देणार आहेत. दुपारी 2.15 वाजता ते अक्कलकोट येथून हेलिकॉप्टरने गाणगापूर च्या दिशेने रवाना होणार आहेत. गाणगापूर येथे दर्शनानंतर विशेष विमानाने ते दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here