‘देवकृपा’ :’या’ महसूल अधिका-याने केली कोरोनावर मात

0

महेश हणमे  9890440480

दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे सावट संपूर्ण देशभर पसरत आहे. सोलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत आहे. मात्र या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक चित्र म्हणजे बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा वाढत आहे. आज बुधवारी दुपारी सोलापुरातील एका महसूल अधिकाऱ्याने कोरोनावर मात केली आणि हा युवा योद्धा बरा झाला. या ‘कोव्हिड फायटर’ वर अभिनंदन व शुभेच्छा यांचा वर्षाव होतोय.

काही दिवसापूर्वी एका प्रशासकीय अधिका-याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. वा-याच्या वेगाने ही बातमी सर्वत्र पसरली. या महसूल अधिका-याला उपचारासाठी शहरातील एका कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. या युवा अधिका-याने देवकृपेने आत्मविश्वास बळकट केला. वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनी सतत वाढवलेले मनोबल, आस्थेने केलेली विचारपूस आणि वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर यांच्या मेहनतीमुळे मी कोरोनावर मात करू शकलो असे MH13 NEWS शी बोलताना सांगितले.

या प्रसंगी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांनी मला आधार दिला. माझ्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करून  या कठिण प्रसंगी फोन वरून आधार देऊन कुटुंबियांचे मनोबल वाढवले.

नागरिकांना माझे आवाहन असे आहे की मास्कचा वापर करावा. डोळे, नाक, तोंड याला वारंवार हात लावू नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. म्हणजे या विषाणूची बाधा होणार नाही.

महसूल अधिकारी, सोलापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here