MH13 news network
खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पाठपुराव्याने सोलापूर जिल्ह्यास देशातील एक्सपोर्ट सेंटर म्हणून मान्यता दिली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे खासदार डॉ. महास्वामी यांनी राष्ट्रीय महामार्ग, फलोत्पादन यामुळे सोलापूर जिल्हा पोषक असल्याने सोलापूरला एक्सपोर्ट सेंटर म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. सोलापूरच्या टेक्सटाइल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आसून सोलापुरातील वस्त्रोद्योग उद्योजकांना व कामगारांना याचा फायदा होणार आहे.