राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची नियुक्ती

युवकांचे संघटन करून लोकहिताची कामे करणार - चेतन गायकवाड

0

By-एम एच१३न्यूज, वेबटीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदी चेतन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरसेवक नागेश गायकवाड यांचे ते जेष्ठ सुपुत्र आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी गायकवाड यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले. त्याचसोबत भावी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी शहर अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, महापालिकेतील गटनेते किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लोकहिताच्या माध्यमातून तरुणांचे संघटन करणार असल्याची प्रतिक्रिया चेतन गायकवाड यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here