युवतीवर लग्नाचे अमिष दाखवून केला बलात्कार ; या ४ आरोपींना…

0

MH13 NEWS Network

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी सोलापुरातील चार आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे अशी माहिती आरोपींच्या वकिलांनी दिली.

यात हकिकत अशी की, यातील आरोपी संशयित आरोपी आकाश जेऊरकर (वय वर्ष 25 )राहणार विजापूर रोड सोलापूर याने पिडीतेस इंस्टाग्राम च्या सामाजिक माध्यमातुन फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवुन ओळख निर्माण केली होती. नंतर काही दिवसांनी आरोपी हा पिडीता ही तिच्या मैत्रिणीच्या घराजवळ दि. १३/१२/२०२० रोजी भेटण्याकरीता गेली असता आरोपी क्र. १ ने पिडीतेस जवळ ओढुन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यास पिडीतीने नकार दिला व आरोपीस यास ब्लॉक केले. त्यानंतर आरोपी क्र. १ हा पिडीतेस वारंवार फोन करत होता. परंतु, पिडीतेने त्याचा फोन स्विकारला नाही तद्नंतर आरोपी क्र. १ ने पिडीतेस मेसेज करुन माफी मागितली. दि. १५/१२/२०२० रोजी आरोपी क्र. १ ने पिडीतेस फोन करुन आपण कोठेतरी बाहेर जाऊ असे सांगितले व पिडीतेस हॉटेल रॉयल इन येथे घेऊन गेला व पिडीतेस लग्नाचे अमिष दाखवून पिडीतेसोबत जबरदस्तीने संभोग केला. त्यानंतर दि. १८/०१/२०२१ ते ०७/०५/२०२१ पर्यंत वारंवार आरोपी क्र. १ ने पिडीतेस लग्न करतो असे आश्वासन देऊन संभोग केला. त्यानंतर आरोपी क्र. १ ने पिडीतेस लग्नाचे आश्वासन देऊन घर भाड्याने घेण्यास मदत केली. त्यानंतर देखील आरोपी क्र. १ ने पिडीतेसोबत वारंवार संभोग केला. दरम्यान पिडीता ही गरोदर झाली.

त्यानंतर पिडीतेने संशयित आरोपी राजशेखर जेऊरकर वय वर्ष ५५ विजापूर रोड यांना सदर संबंधाची माहिती दिली व गरोदर असेलेबाबत कल्पना दिली. त्यानंतर दि. १६/०७/२०२१ रोजी पिडीता ही आरोपींच्या घरी गेली त्यावेळी आकाश,त्याचे वडील आणि दोन बहिणींनी पिडीतेस घरात कोंडून ठेवले. त्यामुळे पिडीतेने पोलिसांना फोन केला व पोलीस आरोपीच्या घरी आले. त्यावेळेस आरोपी क्र. ३ व ४ यांनी फिर्यादीस दम देऊन पोलीसांना परत पाठवण्यास भाग पाडले. त्यामुळे शेवटी पिडीतेने आरोपींविरुध्द भा.द.वि. कलम ३४२, ३५४, ३७६, ४१७, ५०६ व ३४ प्रमाणे विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली होती.

यात आरोपींनी अॅड. गणेश तानाजी पवार व अॅड. सागर तानाजी पवार यांचेतर्फे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जामिन अर्जाच्या सुनावणीच्या वेळी आरोपीच्या वकिलांनी मूळ फिर्यादीने दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ देऊन, फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपी क्र. १ व पिडीता यांच्या दरम्यान झालेला संभोग हा संमतीने झाल्याचे दिसून येते त्यामुळे बलात्काराचा गुन्हा निष्पन्न होत नाही असा युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून विशेष सत्र न्यायाधीश श्रीमती उल्का जोशी यांनी आरोपी क्र. १ ते ४ यांचा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. गणेश तानाजी पवार व अॅड. सागर तानाजी पवार, अॅड. एन.डी. साबळे, अॅड. सतिश राजमाने, अॅड. रवि शिवशरण, सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंह राजपूत व मूळ फिर्यादीतर्फे अॅड. अमित आळंगे यांनी काम पाहीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here