असं हे ‘रक्षाबंधन’ आणि ‘ओवाळणी’ ; हॉस्पिटलमध्ये बांधल्या ‘राख्या’

0

MH13 News Network

सोलापूर :कोरोना महामारी काळात रुग्णालयातील डॉक्टर्स ब्रदर व इतर कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. या आरोग्य रक्षकांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा उपक्रम श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने केला.

शनिवारी सोलापूर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे सिध्देश्वर हाँस्पिटलचे मेडिकल आँफिसर डॉ.उत्कर्ष वैद्य, संस्थापक महेश कासट आदी प्रमुख उपस्थिती होती. ऑन ड्युटी असताना राख्या बांधून खूप चांगला उपक्रम घेतल्याबद्दल आरोग्य रक्षकांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीशंकर बंडगर, अक्षय हुनगुंद, मिलीन भोसले, गणेश माने, प्रा.गणेश लेगंरे, शुभम हंचाटे, नरसिंह लकडे, मल्लिकार्जुन यणपे यांनी परिश्रम घेतले.

या भगिनींनी बांधली राखी

यावेळी रेशीमी हिप्परगे, राजेश्री राजगुरू, जनाबाई खराडे, सारिका शिंदे, सपना शिंदे, जयाबाई थीटे, जिजाबाई पवार, निता इंगळे, रुपाली काळे, शोभा घंटे, सुवर्ण शहा, अक्षता कासट, माधुरी चव्हाण, संध्या जाधव, लीना बनसोडे या भगिनींनी आरती ओवाळून हॉस्पिटल मधील आरोग्य रक्षकांच्या दीर्घायुष्यची प्रार्थना केली.

आरोग्यरक्षणासाठी ओवाळणी
म्हणून दिले सॅनिटायझरसह पाच वस्तू

भगिनींच्या आरोग्यरक्षणासाठी कोरोनाच्या काळात सॅनिटायझर, मास्क , साबण, हॅन्ड ग्लोज, आर्सेनिक अल्बम 30 या वस्तू ओवाळणी म्हणून देण्यात आल्या दैनंदिन जीवनात आता आरोग्यासाठी या वस्तू अत्यंत गरजेच्या आहेत म्हणून एक आगळीवेगळी ओवाळणी देण्याचा प्रयत्न श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने केला असल्याची माहिती संस्थापक महेश कासट यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here