योगीराज वाघमारे आणि डॉ.सारीपुत्र तुपेरे यांच्या ग्रंथांचे बुधवारी प्रकाशन

0

योगीराज वाघमारे आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे यांच्या ग्रंथांचे बुधवारी प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे लिखित ललितग्रंथ “पत्रास कारण की..” आणि डॉ. सारीपुत्र तुपेरे लिखित काव्यसंग्रह “तुझ्या बोटाच्या दिशेने चालत आहे ” या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन बुधवार, २५ जानेवारी रोजी आयोजिले आहे. रंगभवन येथील समाजकल्याण सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. थिंक टँक पब्लिकेशन्सने हे दोन्ही ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

हा ग्रंथ प्रकाशन समारंभ ज्येष्ठ कथाकार बा. ना. धांडोरे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी सोशल कॉलेजचे प्राचार्य डॉ. इ. जा. तांबोळी असतील. प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ लेखक डॉ. शेरअली शेख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. डी. शिंदे, बौद्ध साहित्याचे अभ्यासक डॉ. संघप्रकाश दुड्डे मार्गदर्शन करतील.

या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन थिंक टँक पब्लिकेशन्सचे संचालक डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here