MH13 News Network
प्रियांकाची ‘बंगलुरु ते सोलापूर’ सायकल स्वारी!
सोलापूर : सोलापूरातील उद्योजक आणि पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा यांची कन्या प्रियांका हिने कर्नाटकातील बंगलुरु ते सोलापूर सायकल वारी पाच दिवसांत पूर्ण केली आहे. तीने एकटीनेच सायकल वारी केली हे विशेष.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुरुवार, ९ मार्च रोजी बंगलोर येथून सायकलस्वार झालेली प्रियांका तिस-या दिवशी हम्पी येथे पोहोचली. तेथून पुन्हा सुरवात करुन १३ मार्च रोजी सोमवारी सोलापूरला पोहोचली. तिचे आई – वडील दोघे तिच्या स्वागतासाठी सोलापूर – विजयपूर मार्गावरील कर्नाटक सीमेवर उपस्थित होते. गतवर्षी बंगलुरु ते गोकर्ण तसेच हैदराबाद ते वरंगल अश्याप्रकारे तिने सायकल स्वारी केली आहे. संगणक अभियंता असून तिचे शिक्षण एमबीए झाले आहे. सध्या ई – कॉमर्स कंपनीच्या मॅनेंजर म्हणून बंगलुरु येथे कार्यरत आहे. लहानपणापासून वडिलांच्या प्रेरणेने तिला सायकल भ्रमंती करणे आवड निर्माण झाली आहे.
१९८१साली तीचे वडील गणेश पेनगोंडा हे महाविद्यालयीन काळात सोलापूर ते नवी दिल्ली असा सायकल स्वारी ३० दिवसात पूर्ण केली होती. त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची भेट घेतली होती. ते उत्कृष्ट सायकलपटू होते. तसेच जलद सायकल चालवण्याच्या स्पर्धेत अनेक पदके मिळवले होते.