वागदरी येथील मुक्त साहित्यिक धोंडप्पा नंदे “प्राईड ऑफ स्पंदन” पुरस्काराने सन्मानित

विविधांगी लेखन कौशल्य व मुक्त पत्रकारितेचा गौरव

0

By-MH13 NEWS,वेब/टीम

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पञकार व स्तंभ लेखक,विविधांगी साहित्यिक धोंडप्पा नंदे यांना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दिला जाणा पञकारिता व साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्या बदल ट्रस्ट यांच्या वतीने राज्यस्तरीय ‘प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले.


सदरील पुरस्काराचे वितरण कराड जिल्हा सातारा येथे यशवंतराव चव्हाण स्मृति सदन (टाऊन हॉल) कराड येथे सुप्रसिध्द अभिनेत्री अश्विनी महांगडे (स्वराज्यरक्षक संभाजी मालिका फेम राणूआक्का), यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पञ देऊन गौरवण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वप्नील लोखंडे (गुन्हे अन्वेषण विभाग,कराड) पदश्री विजय शहा,तसेच यास्मिन लागिर झालं जी फेम लक्ष्मी विभुते, यशस्वी उद्योजक सर्जेराव यादव, स्वप्नील लोखंडे, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड.जनार्दन बोत्रे, सुप्रसिध्द लावणीसम्राज्ञी विजया पालव, डॉ.कोमल कुंदप, सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर डॉ.राजेंद्र कंटक, अँड.विठ्ठलराव येळवे (नोटरी, भारत सरकार), प्रा.ए.बी.कणसे व स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेष्मा डाकवे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्तीना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले

धोंडपा नंदे वागदरी येथील मुक्त पञकार, वृत्तपञ लेखक म्हणून गेल्या २० वर्षापासून महाराष्ट्रातील विविध दैनिकांतून सातत्याने लेखन करत आहेत.त्यांचे आतापर्यत ७००० हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. नंदे यांच्या लेखनास यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. बदल्यात काळानुसार नंदे यांनी डिजिटल मीडियावर सातत्याने लेखन करत आहेत. ‘प्राईड ऑफ स्पंदन” पुरस्कार मिळाल्या बदल वागदरी येथील त्याचे मित्र परिवार अभिनंदन केले आहे.त्याचसोबत सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here