अकोले- मंद्रुप प्रहार संघटनेच्या वतीने सरकारचा निषेध

0

उत्तर सोलापूर , (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या किल्ले गडकोट भाड्याने देण्याच्या आदेशाचा प्रहार संघटना अकोले मंद्रुप यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला .
प्रहार संघटना अकोले मंद्रुप यांनी टायर जाळून , त्याचबरोबर गावातील काही दुकाने बंद ठेवुन त्यानी सरकार चा जाहीर निषेध केला . महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अठरापगड जाती धर्माच्या मावळ्यांच्या बलीदानाचा अपमान सहन करणार नाही असा इशारा समर्थ गुंड यांनी दिला.

यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या . यावेळी समर्थ गुंड, शिवछत्रपती तरूण मंडळांचे अध्यक्ष अमोल माने, संदेश सुरवसे, सद्दाम शेख, बाबुराव क्षिरसागर, वैभव जाधव, अजित पवार, रमेश पवार, अतुल माने आदि उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here