जिल्ह्यातील दोन लाख ४३ हजारावर शेतकरी पात्र

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना

0

MH13NEWS,नेटवर्क

सोलापूर दि.26 :- प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील 2 लाख43 हजार 530 शेतकरी कुटुंबे पात्र ठरली असून त्यांची माहिती एनआयसीच्या पोर्टलवर अपलोड केली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी आज येथे सांगितली.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जिल्ह्यातील कार्यवाही संदर्भात त्यांनी आज माहिती दिली. त्यांनी सांगितले, जिल्ह्यातील एकूण 1145 गावांपैकी 1130  गावातील शेतकरी कुटुंबांची संख्या संकलित करण्यात  आली आहे. त्यापैकी 1103 गावातील कुटुंबांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 3 लाख 63 हजार 320 शेतकरी कुटुंबांची माहिती या योजनेसाठी पात्र ठरली असून त्यापैकी 2 लाख 43 हजार 530 शेतकरी कुटुंबांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.  पात्र ठरलेल्या कुटुंबांची तुलना करता माहिती अपलोड केलेल्या कुटुंबांची संख्या 67 टक्के आहे. शंभर टक्के  शेतक-यांनी नांवे येत्या दोन दिवसात अपलोड केली जातील, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here