‘मागेल त्याला रोप’ : नाविंदगी विकास फाऊंडेशनच्या अभिनव उपक्रमास प्रतिसाद

0

धोंडप्पा नंदे, MH13NEWS

नाविंदगी विकास फाऊंडेशन व अक्कलकोट घडामोडी ग्रुप च्या वतीने नाविंदगी येथे ‘मागेल त्याला रोप ‘एक आगळा वेगळा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.या अभिनव उपक्रमास नागरिकांचा  चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
नाविंदगी येथे पूर्वतयारी म्हणून शेतकऱ्यांच्या व स्थानिक पर्यावरण प्रेमी नागरिकांकडे कोणत्या रोपांची लागण व संगोपन करणार आहेत याची महिती गोळा करण्यात आली .त्यांच्या मागणीनुसारच रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये दुर्मिळ रोपे तसेच बदाम,अशोक,रामफळ,जांभूळ व चिंच रोप देण्यात आले.

नाविंदगी प्रगतीशील शेतकरी व नागरिक चंद्रकांत हंगरंगी,यल्लप्पा तळवार,भिमा भरमशेटटी,हरिचद्र राठोड,रमेश राठोड,विश्वनाथ चव्हाण,खुबु राठोड,धनसिंग राठोड,रमेश चव्हाण,नातु राठोड,संतोष राठोड,सुनिल राठोड नाविदगी आणि तांडा येथील ३० शेतकऱ्यांना नाविंदगी विकास फाऊंडेशन चे संस्थापक व अक्कलकोट घडामोडी चे सहप्रमुख संतोष राठोड यांच्या हस्ते रोपे देण्यात आले.

यावेळी संतोष राठोड उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कि ,’निसर्गाचा समतोल राखण्यासाठी झाडाची महत्त्वाची भूमिका आहे दिलेल्या झाडाची रोपचे संवर्धन करावे असे आवाहन केले व जो शेतकरी व नागरिक रोपांचं योग्य  संगोपन करेल त्यांना बक्षिस देण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली.
यावेळी नाविंदगी विकास फाऊंडेशन चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. या अभिनव उपक्रमास नागरिकांनी व शेतकऱ्यांनी कौतुक केले .असे आदर्श उपक्रम इतर सामाजिक संघटनानी राबवावे असे मत स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here