पंढरपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी यांच्या हस्ते पालखी मार्गांचे भूमिपूजन

0

MH13 न्यूज नेटवर्क

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे भूमिपूजन आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजता पंढरपूर येथील रेल्वे मैदानावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत तर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे पंढरपूर येथे भूमिपूजन सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहतील. यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव त ठाकरे हेदेखील मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. ऑनलाईन भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय रस्ते व वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग हे देखील आजच्या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा वाजता हेलिकॉफ्टरने ते पंढरपुरात दाखल होत आहेत. एक वाजता श्री विठ्ठल व रुक्मिणीचे दर्शन घेतील. त्यानंतर साडेतीन वाजता भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. यासोबत माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेदेखील भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरिता पंढरपुरात येत आहेत. त्यापूर्वी ते अक्कलकोटचा दौरा करणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता हेलिकॉप्टरने ते अक्कलकोटला येत आहेत. अकरा वाजता स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन बारा वाजता पंढरपूरकडे ते रवाना होणार आहेत. त्यानंतर साडेतीन वाजता भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या भव्य प्रोजेक्टचे उद्घाटन करणार आहेत यावेळी ते काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष लागले आहे कारण काल राजधानी दिल्लीत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक पार पडली. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारवर मोठे ताशेरे ओढण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सेवा आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा मंत्र दिला होता. येऊ घातलेली विधानपरिषद निवडणूक आणि महापालिका निवडणूक या पार्श्वभूमीवर भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी होणारी भाषणे चर्चेचा विषय ठरणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here