आदेश भंग ; अमेरिकन नागरिकावर पंढरपुरात गुन्हा दाखल…

0

पंढरपूर :
देशात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहे .जिल्हाबंदी तसेच संचारबंदी चे आदेश सर्वत्र लागू करण्यात आलेले असताना या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की…

पुणे जिल्ह्यातील थेउर येथून चार जण पंढरपूरात दाखल झाल्याने एकच खळबळ माजलीय. हे चारही जण इस्कॉनचे साधक असून यामध्ये एका अमेरिकन साधकाचा समावेश आहे. अत्यावश्यक सेवेच्या पासवर हे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत . याबाबतीत पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढविला आहे. तसेच संचारबंदी देखिल लागू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्हा बंदी कडक केली आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर जास्त आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बंदीचे आदेश जुगारुन , अत्यावश्यक सेवेच्या पासवर इस्कॉनच्या साधकांनी पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथिल इस्कॉन मंदिरात प्रवेश केला. ही बाब ग्रामस्थांच्या निर्देशनास येताच त्यांनी पोलिसांना कळविले.
प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत या चारही साधकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये न्यूयॉर्क (अमेरिका) , नागपूर , सांगली आणि बेळगाव कर्नाटक राज्यातील साधकांचा समावेश आहे. हे चारही जण होम क्वारंटाईन असताना पळून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

असा केला प्रवास …
एका अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनातून हे चार पंढरपूरमध्ये आले आहेत.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार गाव कामगार तलाठी दिपक राऊत यांनी शासकीय तक्रार दाखल केली आहे. वरिल चारही साधकांवर भादवि १८८, २६९, २७०, आपत्ती व्यवस्थापन २००५ चे कलम ५१(ब) , साथीचे रोग नियंत्रण अधिनियम १८९७ चे कलम २,३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या या चौघांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here