शिवजन्मोत्सव ऑनलाइन परवाने त्वरित सुरू करा

0

MH13NEWS Network

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली असून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून अद्याप शिवजन्मोत्सव चे ऑनलाइन परवाने सुरू नाही. शिवजन्मोत्सव ऑनलाइन परवाने त्वरित सुरू करावे असे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांनी पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांना दिले.


संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या भव्य प्रमाणात साजरी करण्यात येते शिवजयंती मिरवणूक पाहण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून व कर्नाटक राज्यातील शिवप्रेमी सोलापुरात येतात सोलापुरात शिवजयंती निमित्त मिरवणूक काढणारे अनेक मोठे मंडले आहेत त्याची डेकोरेशन व लेझीम सराव तयारी महिना भरापासून सुरू होते. त्यामुळे विविध परवाने लागतात ते मिळण्यासाठी आठ दहा दिवसाचा वेळ लागतो त्यामुळे शिवजन्मोत्सव ऑनलाइन परवाने त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी केली असता लवकरच ऑनलाईन परवाने सुरू करण्यात येतील असे आश्वासन पोलीस उपायुक्त बापूसाहेब बांगर यांनी दिले.
यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष श्रीमंत पात्रे, विनोद राठोड, सचिन होणमाने ईत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here