Online मुळे पारंपारिक व मुल्य शिक्षणाचा -हास -डाॅ. राजशेखर येळीकर

0

ऑनलाईन शिक्षण पद्धतीने पारंपारिक व मुल्य शिक्षणाचा -हास होत आहे – डाॅ राजशेखर येळीकर

सोलापूर:- मुळात अध्यापनाची उदासिनता व अलीकडील काळात सुरू झालेली ऑनलाईन शिक्षण पद्धती यामुळेच पारंपारिक व मुल्य शिक्षणाचा -हास होत आहे, असे प्रतिपादन सोलापुरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त प्रा. डाॅ. राजशेखर येळीकर यांनी व्यक्त केले. येथील लायन्स क्लब ऑफ सोलापूर परिवाराच्या वतीने शनिवारी हॅच फ्री मेसाॅनिक हाॅल येथे
लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार
प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी लायन्स क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष गोविंद मंत्री यांनी शिक्षकदिना निमित्त देत असलेल्या लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्काराबद्दल माहीती देऊन प्रास्तविक केले.


शैक्षणीक क्षेत्रात किमान दोन दशके उल्लेखनीय कार्य करणा-या पंचप्पा मेणसे (करंजकर विद्यालय), नासीरोद्दीन आळंदकर ( कुचन हायस्कूल), सौ. प्रतिभा दासरी(न्यू. बसवेश्वर मराठी विद्यालय), संजय इंडे (आदर्श हायस्कूल, ) व नितीन भोसले ( मार्कंडेय हायस्कूल कुंभारी ) यांना प्रमुख पाहुणे प्रा. डाॅ. राजशेखर येळीकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन त्यांना
लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार
देऊन गौरविण्यात आले. सौ. प्रतिभा दासरी व नासीरोद्दीन आळंदकर या दोघांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. यावेळेस क्लबमधील शिक्षक सदस्यांना ही प्रा. येळीकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. इंगळे, मीनाक्षी पाचकवडे, प्रकाश भुतडा, श्रीकांत सोनी, अकबर मुल्ला आदींनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अमिता कारंडे यांनी केले तर क्लबच्या सचिवा सौ. नंदा लाहोटी यांनी आभार मानले. याप्रसंगी किशोर नाडकर्णी, गोविंद लाहोटी, अमोल गवसने,सुरेखा गंभिरे, सुश्मीता कोरे, संज्योती बिराजदार, सुरेखा मंत्री,सचिन पाटील, दिनेश बिराजदार, नितीन देगांवकर, नरेंद्र गंभिरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here