कुंभारी |दिवाळी निमित्त लहान मुलांसाठी ओम साई प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

0
MH13 News Network
सोलापूर – येथील ओम साई प्रतिष्ठान च्या वतीने प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी च्या निमित्ताने लहान मुलांना नवीन कपडे भेट देण्यात आले.प्रत्येक वर्षी ओम साई प्रतिष्ठान च्या वतीने दिवाळी निम्मित विविध उपक्रम राबविले जातात .गरजू, आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या परिवार मधील लहान मुलांना कुंभारी येथील आधार मतिमंद निवासी विद्यालय च्या प्रागणात या कपड्यांचे वितरण करण्यात आले .एक ते दीड वर्षे वयोगटातील 40 लहान मुलांना कपडे देण्यात आला.
आधार मतिमंद निवासी विद्यालय च्या प्रागणात हा कार्यक्रम पार पडला .कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मोनिका जिंदे ,ओम साई प्रतिष्ठान चे श्री विनोद कर्पेकर ,प्रा विक्रमसिंह बायस श्री मयूर गवते तर आधार मतिमंद विद्यालय चे श्री जगदीश कलकेरी ,सौ. शुभांगी जगदीश कलकेरी ,श्री शुभम कलकेरी शुभदा कलकेरी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा विक्रमसिंह बायस यांनी केले तर आभार श्री शुभम कलकेरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here