ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी निर्धार मेळावा यशस्वी करा-माजी मंञी सिध्दाराम म्हेञे

0

ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी निर्धार मेळावा यशस्वी करा-माजी मंञी सिध्दाराम म्हेञे

सोलापूर दि. 21 ऑगस्ट 2021- ओबीसी भटके-विमुक्त समाजाच्या निर्धार मेळाव्याच्या तयारीसाठी आज शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे माजी मंत्री सिद्धाराम म्हेञे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरातील विविध ओबीसी समाज प्रमुखांची व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, आजच्या परिस्थितीत ओबीसी समाजाचे हक्क अधिकार व आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्व अठरापगड जाती- जमातींना संघटित झालं पाहिजे त्या सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी 31 ऑगस्टला होणाऱ्या निर्धार मेळाव्यात प्रचंड संख्येने उपस्थित रहा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी युवराज चुंबळकर,अँड.राजन दीक्षित,हसिब नदाफ,संजय जोगीपेटकर, पांडुरंग चौधरीसर,अशोक इंदापुरे,सिद्राम रुद्राल,शेखर बंगाळे,अलकाताई राठोड,प्रा.भोजराव पवार,विलास पाटील,मनिषा माने,अर्चना वडनाल, सादिक कुरेशी आदींनी आपले विचार मांडले निमंत्रक शरद कोळी यांनी मेळाव्या मागची भूमिका विशद केली व जिल्ह्यातून प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.ओबीसी भटके- विमुक्त संघर्ष समन्वय समितीचे राज्याचे नेते अरुण खरमाटे यांनी मा.ना. विजय वडेट्टीवार यांची जिल्ह्या जिल्ह्यातून मेळावा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला व समस्त ओबीसी भटका-विमुक्त समाज राज्यभरातून एकत्र करून त्याच्या न्याय मागण्यासाठी लढा उभारण्याचा उद्देश व्यक्त केला. यावेळी बंजारा समाजाच्या महिला नेत्या साधनाताई राठोड,नवनाथ पडळकर,धनंजय बेडदे,प्रकाश राठोड यांनी मार्गदर्शन केले.


या बैठकीस गोवर्धन कोडपाक,युवराज जाधव,राकेश पुंजाल, जितेंद्र बेन्नाळकर,अँड.आर.व्ही.गुरव,रमाकांत साळुंके,सरदार नदाफसर, सुरेश पवार, संदीप राठोड, अंबादास गुत्तिकोंडा,निमिषा वाघमोडे,माधुरी डहाळे,मनिषा माने, व्ही एस पाटील, अशोक ढोणे, रमाकांत साळुंखे, आप्पासाहेब पाटील,जोशी समाजाचे नेते लक्ष्मण भोसले,समाज भूषण भिमराव बंडगर,महेश श्रीमंगले, अशोक बल्ला, व्यंकटेश पडाल,राजकुमार मालतूमकर,शेखर कटकम,उमा कोरे, जितेंद्र बेवाळकर, अश्विनी वाघमोडे, रंगनाथ पोळ,दत्ताजी पवार,नागेश चव्हाण यांच्यासर शहरातील विविध समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here