Breaking | सोलापुरातील ओबीसी निर्धार मेळाव्यास मिळाली परवानगी

0

सोलापुरातील ओबीसी निर्धार मेळाव्यास मिळाली परवानगी

विमुक्त दिनानिमित्त ओबीसी व्हिजेएनटी संघर्ष समन्वय समिती, सोलापूर यांचे वतीने मंगळवार दि. 31 रोजी सोलापूरात गंगा लॉन्स, टाकळीकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे सकाळी 11 ते 3 या वेळेत निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी विजय वडेवट्टीवार सामाजिक न्याय मदत पुनर्वसन मंत्री, .श्री. छगन भुजबळ, नाना पाटोले, .प्रणितीताई शिंदे आमदार व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यास कोविड नियमाने पालन करण्याच्या अटीवर मंगळवार दि. 31/08/2021 रोजी विमुक्त दिनानिमित्त सोलापूरात गंगा लॉन्स, टाकळीकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यास परवानगी देण्यात येत आहे. अशी माहिती संयोजक व ओबीसी नेते शरद कोळी यांनी दिली.

सदर मेळाव्यास वरिष्ठ पोलिस निरिक्षक, बिजापूर नाका, पोलिस स्टेशन यांनी सदर मेळाव्यास परवानगी नाकारली आहे. तरी सदर मेळाव्यास परवानगी देणेबाबत वरिष्ठ पोलिस निरिक्षक, विजापूर नाका, पोलिस स्टेशन सोलापूर व महानगरपालिकाच्या संबंधित झोनला योग्य ते निर्देश द्यावे अशी विनंती मेळाव्याचे संयोजक शरद कोळी यांनी केली आहे.

आजला शासनाचे दि. 11 ऑगस्ट 2021 चे आदेशास अनुसरून सोलापूर शहरासाठी ब्रेक द चेन सुधारित मागदर्शक सूचना व आदेश अंतर्गत संदर्भ क्र.2 च्या आदेशातील अ.क्र. 12 नुसार कोविङ प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करणेबाबत केंद्र शासनाने तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव सोलापूर शहरात गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकिय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रैली, मोर्च वरील निर्बंध कायम राहतील. उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे पालन होत नसल्यास अथवा सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित आयोजकावर आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे नमूद आहे.

संदर्भ क्र.3 च्या आदेशातील अ.क्र.10 नुसार मेळावे व इतर सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजन/धार्मिक कार्यक्रमासाठी सोमवार ने शुक्रवार सांयकाळी 04.00 वाजेपर्यंत एकूण क्षमतेच्या 50% मर्यादिमध्ये व तीन तासापेक्षा जास्त असू नये तसेच खाद्यपदार्थ सेवन करणेस प्रतिबंध राहितील व सदर कार्यक्रमात कोविड नियमाने पालन करण्याच्या अटीवर मंगळवार दि. 31/08/2021 रोजी विमुक्त दिनानिमित्त सोलापूरात गंगा लॉन्स, टाकळीकर मंगल कार्यालय, जुळे सोलापूर येथे होणाऱ्या निर्धार मेळाव्यास परवानगी देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here