आता फक्त भिमाचं रक्त :फुल्ल जल्लोषात,अलोट गर्दीत अ‍ॅड.आंबेडकरांनी भरला उमेदवारी अर्ज

हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

By-MH13NEWS,नेटवर्क

राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या आणि काहींच्या प्रतिष्ठेची तर काहींच्या अस्तित्वाची लढाई असणाऱ्या सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रंगपंचमीच्या दिवशी आज दि.२५ मार्च रोजी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या वेळी हजारोच्या संख्येने स्त्री-पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते.

या आधीच सुजात आंबेडकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या रॅलीसाठी लोक जमा होण्यास सुरुवात झाली होती.न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी अ‍ॅड आंबेडकर ,सुजात आंबेडकर,शंकरराव लिंगे, सामीउल्ला शेख, श्रीशैल गायकवाड, प्राध्यापक डॉ. धम्मपाल माशाळकर,विक्रांत गायकवाड आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बॉबी ग्रुपचे अजित गायकवाड, कुणाल बाबरे, आरजी ग्रुप,रॉयल ग्रुप,सह हजारो भीमसैनिक उपस्थित होते.

सकाळी साडे नऊ वाजल्यापासून न्यु बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे कार्यकर्त्यानी मोठी गर्दी केली होती. साधारण पावणेबारा वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे डॉ.आंबेडकर उद्यान येथे आगमन झाले. उद्यानांमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत उस्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला होता.

रॅली मधील युवकांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या ‘आता फक्त भिमाच रक्त,जय भीम या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या निषेधाच्या ही घोषणा देण्यात आल्या. एम आय एम चे तोफिक शेख यांच्या मोटरसायकल वर बसून अ‍ॅड.आंबेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात गेले.यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सोलापूर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी एमआयएमचे तौफिक शेख, श्रीशैल गायकवाड, सामीउल्लाह शेख, शंकरराव लिंगे, प्रा. धम्मपाल माशाळकर आदी उपस्थित होते.

निळा, हिरवा, पिवळ्या रंगाचे झेंडे कार्यकर्ते हातामध्ये घेऊन घोषणाबाजी करीत होते.पदयात्रेत मोठ्या प्रमाणात हजारो कार्यकर्त्यानी सहभाग नोंदविला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here