पाच्छा पेठेत एक नवीन कोरोना रुग्ण ; एकूण रुग्ण संख्या 14 -जिल्हाधिकारी

0

सोलापुरातील आयसोलेशन वॉर्डमध्ये 669 जणांचे स्वब घेण्यात आले त्यापैकी 504 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 490 व्यक्ती निगेटिव्ह असून 14 व्यक्ती पॉझिटिव आढळल्या आहेत आज एक रुग्ण वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

आज शनिवारी दुपारपर्यंतची अद्यावत माहिती असल्याचं जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले
नवीन आढळलेला रुग्ण हा पाच्छा पेठ येथील रहिवासी असून त्याच्यावर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत शहरातील नागरिकांना आवाहन असून त्यांनी मास्कचा वापर करावा व वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे आणि घरातच थांबावे असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी बोलताना केले.
आजच्या घडीला सोलापूर मध्ये एकूण 14 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी एक व्यक्ती मृत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here