अनलॉक सोलापूर | आज तब्बल 102 कोरोनाबाधित ; 2 जणांचा मृत्यू

0

MH 13 News Network

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज शुक्रवारी 342 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले .त्यापैकी 240 अहवाल निगेटिव्ह आले असून 102 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात 65 पुरुष तर 37 महिलांचा समावेश होतो .आज 369 प्रलंबित अहवाल असल्याची माहिती सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.आज फक्त 3 बाधित व्यक्ती बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

आज 2 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. यामध्ये यांचा मृत्यू झाल्याची माहिती सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.

आजपर्यंत  2499 पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या इतकी झाली आहे, तर आजपर्यंत एकूण 263 जणांचा मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 852 इतकी आहे, तर रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1384 इतकी समाधानकारक आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here