उदयनराजेंचा पराभव करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांनी घेतली खासदारकीची शपथ

0

MH13 NEWS NETWORK:

उदयनराजे भोसले यांच्याविरोधात साताऱ्यातून निवडून आलेले श्रीनिवास पाटील यांनी आज (१८ नोव्हेंबर) खासदारकीची शपथ घेतली. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना सत्य आणि गोपनियतेची शपथ दिली. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांसह सातारा लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली. या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी प्रस्थापित खासदार उदयनराजे भोसलेंचा दारुण पराभव केला. विधानसभेच्या तोंडावर उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उदयनराजेंविरोधात उमेदवारी देण्यात आली. या पोटनिवडणुकीच्या निकालाने उदयनराजेंना मोठा धक्का दिला.

या निवडणुकीकडे राज्यासह देशभरातील नेत्यांचेही लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकी दरम्यान साताऱ्यात घेतलेली भरपावसातील सभा चांगलीच गाजली. त्यामुळे राष्ट्रवादीला लोकसभेच्या साताऱ्यातील जागेसह विधानसभेच्या निवडणुकीतही चांगला फायदा झाल्याचे दिसून आले. या पोटनिवडणुकीत खासदार उदयनराजे दारुण पराभव तर झालाच. पण ज्या प्रकारे भाजपच्या नेत्यांनी शरद पवार यांच्याविरोधात डरकाळ्या फोडल्या होत्या त्यांनाही हाताची घडी तोंडावर बोट ठेवण्यास भाग पडल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here