श्रीक्षेत्र मार्डी येथे घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ.

0

उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी)- घटस्थापना करुन श्रीक्षेत्र मार्डी येथे श्री यमाईदेवी व श्री रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवास रविवारपासून मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.
श्री यमाईदेवी मंदिरात श्री यमाईदेवी व मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी गुरव व अशोक गुरव यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता घटस्थापना करण्यात आली. तर आद्य देवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी यांच्या निवासस्थानी असलेल्या श्री रेणुकादेवी देवी मंदिरात रेणुकादास मोकाशी,आनंद मोकाशी, दुर्गेश मोकाशी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
श्री यमाईदेवी मंदिरात नवरात्र उत्सव काळात दररोज पहाटे चार वाजता महापूजा, सकाळी नऊ वाजता नित्यपूजा, रात्री नऊ वाजता शेजारती तर रेणुकादेवी मंदिरात सकाळी सहा वाजता नित्यपूजा, रात्री शेजारती हे नित्य उपचार असतील. बुधवार दि. 2 आक्टोबर रोजी ललितापंचमीची पूजा होईल. रविवारी दि.6 आक्टोबर रोजी दुर्गाष्टमी या दिवशी सकाळी सात वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात व सकाळी अकरा वाजता महानवमी तिथी सुरु होताच श्री यमाईदेवी मंदिरात नवचंडी होम होणार आहे.
शनिवारी घटस्थापनेच्या दिवशी दिवसभर यमाईदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शक्तीमंडळाचे कार्यकर्ते श्री यमाईदेवी मंदिरातून ज्योत प्रज्वलित करुन घेऊन जात होते. त्यात उत्तर सोलापूरसह मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, दक्षिण सोलापूर, मोहोळ,बार्शी तालुक्यातील विविध गावच्या शक्तीमंडळांचा समावेश होता. नवरात्रोत्सव काळात भाविकांनी शांतता राखून सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच अविनाश मार्तंडे, उपसरपंच युवराज पवार, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप,विठ्ठ्ल काशीद, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, ग्रामविकास अधिकारी प्रवीण विभुते व श्री यमाईदेवी पुजारी मंडळाच्या वतीने अरुण गुरव, दत्तात्रय गुरव, पंकज गुरव, अमोल गुरव यांनी केले आहे.
______

फोटो ओळी – श्री यमाईदेवी मंदिरात केलेली घटस्थापना, श्री रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना करताना आद्यदेवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी ज्योतिषविशारद रेणुकादास मोकाशी व दुर्गेश मोकाशी इनसेटमध्ये श्री यमाईदेवी व रेणुकादेवीची मूर्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here