हीच मानसिक ताण-तणावची प्रमुख लक्षणे ; माढ्यात राष्ट्रीय मानसिक आरोग्य शिबिर…

0

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी:

काल माढा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय मानसिक कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय मानसिक आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे माढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे मानसोपचार तज्ञ डॉ.हर्षल थडसरे ,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सदानंद व्हनकळस ,माढा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी थोरात, महिला व बाल कल्याण सभापती कल्पना जगदाळे, पाणी पुरवठा सभापती सुप्रिया बंडगर, या मान्यवरांच्या उपस्थितीत धनवंतरीच्या मुर्तीचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

पुजना नंतर प्रमुख पाहुणे अॅड मिनल साठे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात आज कालच्या धावपळीच्या जीवनात मानसिक स्वास्थ्य सांभाळणे आपण विसरूनच गेलो आहोत आणि त्याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. मानसोपचार तज्ञ डॉ. हर्षल थडसरे यांनी उपचारासाठी आलेल्या सर्व रुग्णांना आजारा संदर्भात मार्गदर्शन करताना आपल्याला अस्वस्थ वाटणे ,धडधड होणे ,शारीरिक थकवा, जाणवणे ,चिडचिडेपणा होणे ,झोप नलागणे ,मानसिक दुर्बलतेची भावना निर्माण होणे,आत्महत्येचे विचार येणे ही मानसिक ताण-तणाव ची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगितले. या शिबिरात 45 रूग्णाची तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचलन ग्रामीण रूग्णाचे अजिंक्य मोहिते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शिवाजी थोरात यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे रेवणसिद्ध साखरे ,वैभव हजारे , जानराव अमित सुनसुना , गोयर संभाजी मैंद ,कोटियाना डॉ.सागर पाटील, श्रीमती काळे ,श्रीमती कांबळे ,श्रीमती ठाकरे, तसेच सर्व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here