महापालिकेचा स्तुत्य उपक्रम : बालकाच्या जन्म दाखल्यासोबत एका रोपाची भेट

सामाजिक वनीकरण जागृती अभियानांतर्गत केला संकल्प

0

By-MH13News, network

सामाजिक वनीकरण जागृती अभियानांतर्गत प्रत्येक नवबालकाच्या जन्म दाखल्या सोबत एक रोप (झाड) देण्याचा नवा संकल्प पालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे.या उपक्रमाची सुरूवात महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आली.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या मार्फत 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे .या उपक्रमात एकट्या सोलापूर शहरा करिता एक लाख झाडाच्या लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पालिका प्रशासना कडून विविध सामाजिक संस्था संघटनेच्या मार्फत वृक्षारोपण करून घेत आहे. त्याच बरोबर प्रत्येक व्यक्तीच्या नावे देखील एक झाड जोपासण्याची जागृकता निर्माण झाली पाहिजे. या उद्धात हेतून पालिकेच्या जन्म मृत्यू कार्यालयात येणा-या व्यक्तीला त्याच्या नवजात बालकाच्या नावे एक झाड देऊन मुला प्रमाणे झाडाचे संगोपन झाले पाहिजे.शिवाय मृत व्यक्तीची आठवण म्हणून एक झाड जोपासण्याची मानसिकता मनात निर्माण झाली पाहिजे म्हणक हा उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी दिली.

दरम्यान पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील जन्ममृत्यू कार्यालयात महापौरांनी नवजात बालकाच्या नावे जन्म दाखला दिल्यानंतर एका वृक्षाचे भेट देखील महापौरांनी यावेळी दिली. या सामाजिक उपक्रमाला अधिकाधिक लोकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन ही यावेळी करण्यात आले.

या सामाजिक उपक्रमात पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार जन्म नोंदणी कार्यालयाचे अधिकारी उद्यान विभागाचे प्रमुख मुलांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here