महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती

0

महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी नंदीध्वजाची केली मनोभावे आरती

महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे बाराबंदीत ; नंदीध्वजही घेतला हाती 

सोलापूर :  श्री सिद्धेश्वर यात्रेस धार्मिक विधीने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शुक्रवारी सकाळी हिरेहब्बूंच्या वाड्यात पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी नंदीध्वजांची मनोभावे आरती केली.महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे पारंपरिक बाराबंदी परिधान करून सहभागी झाले होते. त्यांनी नंदीध्वजही हाती घेतला.


याप्रसंगी  महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले,माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, मानकरी राजशेखर हिरेहब्बू , मनोज हिरेहब्बू,  सागर हिरेहब्बू , शिवानंद हिरेहब्बू आणि जगदीश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, माजी आमदार विश्वनाथ चाकोते आदींसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीचे पूजन तसेच मानाच्या पहिल्या आणि दुसर्‍या नंदीध्वजाचे पूजन यावेळी भक्तिभावाने व मंगलमय वातावरणात करण्यात आले.


यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले , महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आणि उपायुक्त विद्या पोळ यांनी पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचे मनोभावे पूजन केले.

निर्विघ्न यात्रा पार पडण्यासाठी
 महापालिका यंत्रणा सज्ज :  आयुक्त शीतल तेली – उगले

श्री सिद्धेश्वर यात्रेस विविध धार्मिक विधीने मंगलमय वातावरणात प्रारंभ होत आहे. देशभरातून लाखो भावीक  येतात. भक्तांचा उत्साह बघायला मिळत आहे. यंदा प्रथमच मला ही भव्ययात्रा पाहण्याचा योग आला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून प्रदक्षिणा मार्गावर सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ही यात्रा निर्विघ्न पार पाडावी यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज आहे असे सांगत महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी कस्तुराबाई चौगुले, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार, मल्लिकार्जुन हुणजे, जयप्रकाश अमणगी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here