प्राण्यांचे मुखवटे घालून बालगोपाळांचे सोलापुरात ‘आंदोलन’ ; पहा काय आहे कारण ..

0

सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूररासह लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आवडीचे पर्यटन स्थळ असलेले महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाची मान्यता कायम राहावी म्हणून संभाजी ब्रिगेड च्या वतीने प्राणिसंग्रहालयाच्या गेट जवळ विविध प्राण्यांचे मुखवटे चढून संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बालगोपाळसुद्धा सहभागी झाले होते.

विविध अडचणी अन् समस्यांमुळे ‘स्मार्ट सिटी’मधील प्राणी संग्रहालय नेहमीच चर्चेत आहे. सोलापुरातील लोकप्रतिनिधी व महापालिका पदाधिकारी अन् अधिकाऱ्यांच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे हे प्राणिसंग्रहालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे असा आरोप संभाजी ब्रिगेड ने केला आहे. पुणे व हैद्राबादनंतर लगतच्या जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात केवळ सोलापूर येथे प्राणीसंग्रहालय आहे. १३७ प्रकारच्या प्राण्याबरोबरच अनेकविध प्रकारचे पक्षी याठिकाणी आहेत. २००८ मध्ये या प्राणी संग्रहालयात जंगलाचा राजा सिंह व किंग कोब्रा या नागराजाचे वास्तव्य होते.

१३७ प्रकारच्या प्राण्यांनी समृद्ध असलेले हे ‘झू’ सोलापूरकरांसह लगतच्या जिल्ह्यातील नागरिक व विद्यार्थ्यांचे आवडीचे पर्यटनस्थळ होते. मात्र, मान्यता धोक्‍यात आल्यानंतर मागील दोन वर्षे हे प्राणीसंग्रहालयात नागरिकांना पाऊल ठेवता आलेले नाही. सर्वात मोठी अडचण ही या प्राणीसंग्रहालयात पशुवैद्यकीय रुग्णालय असणे आवश्‍यक आहे, अशी अट केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकारणाने घातली होती. यासाठी निधी उपलब्ध नसल्याने हा प्रश्‍न राखडला आहे. स्वतंत्र पशुवैद्यकीय रुग्णालयाबरोबरच संरक्षित प्राण्यांना नैसर्गिक अधिवास तयार करणे, योग्य संरक्षक भिंती असाव्यात, क्षमतेपेक्षा अधिक प्राणी ठेवणे, विदेशी पक्षी ठेवणे, अशा अनेक त्रुटी वारंवार काढण्यात आल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश आल्याने सध्या या प्राणीसंग्रहालयातील प्राणी अन्यत्र हलविण्यात यावेत, असे पत्र केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून पाठविण्यात आले आहे….तर पुन्हा फक्त राणीचा बागमहात्मा गांधी प्राणीसंग्रहालयस अजून बरेचजण ‘राणीचा बाग’ म्हणून ओळखतात. सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी योग्य पाठपुरावा न केल्यास या प्राणीसंग्रहालयातील सर्व प्राणी अन्यत्र हलविणे भाग पडेल. प्राणीच नसतील तर ते प्राणीसंग्रहालय न राहता पुन्हा या जागी केवळ बाग व वनराई राहील. महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाचे पुन्हा ‘राणीचा बाग’ होणे हे सोलापूरच्या बालगोपाळांसाठी नुकसानकारक आहे.महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाची मान्यता कायम राहावी म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, उपशहरप्रमुख सिताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष गजानंद शिंदे, संघटक संजय भोसले, आर्यन कदम ,ओंकार कदम, इलियास शेख, रोहन गायकवाड, अहमद शेख ,सागर देवकते, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जाधव ,अनिल गोलेकर , प्रथमेश गुलाब ,राजू मिसळ, नागनाथ चिंतामणी, समर्थ शिंदे ,केवल म्हात्रे ,कृष्णा मिसाळ, विजय सलवार ,विजय कालेकर, भीमराव कालेकर, कुशल म्हात्रे ,सृष्टी पाटील ,सपना तिवारी, साक्षी चव्हाण ,सृष्टी भालेराव, नंदिनी बजे या विद्यार्थिनी सुद्धा उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here