खळबळजनक | महिलेस जबर मारहाण करून रस्त्यावर दिले सोडून ; मोहोळ तालुक्यातील घटना

0

MH13 News Network 

सोलापुरातील मोहोळ तालुक्यात आज सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोठी खळबळजनक घटना घडली असून भांबेवाडी परिसरात एका महिलेस जबर मारहाण करून रस्त्यावर सोडून दिल्याची घटना घडली . यावेळी शिवारातील आजूबाजूचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.

या खळबळजनक प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका महिलेस डोक्यावर आणि हातावर जबर मारहाण केल्याने रक्तस्त्राव झाला असून रस्त्यावर रक्त सांडलेले असल्याचे घटनास्थळी दिसून आले.
एका स्विफ्ट गाडीतून त्या महिलेस भांबेवाडी रस्त्यावर आणण्यात आले. आणि टाकून देऊन गाडी भरधाव वेगाने निघून गेली अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
सदर महिला ही टेंभुर्णी , मोडनिंब परिसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

माझ्या हाताला मोठा मार लागला असून माझा हात मोडला आहे मला डॉक्टरकडे घेऊन चला अशी विनंती महिला करत होती. परिसरातील काही ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ पोलिस पथक तेथे आले आणि महिलेचे पुढील उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले.

ज्या गाडीतून सदर महिलेस मारहाण करून टाकून देण्यात आले.ती गाडी पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर महिलेस उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. त्याच सोबत महिलेचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here