मोहोळ | रस्त्याची लागली ‘वाट’ ; निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार

0

मोहोळ | रस्त्याची लागली ‘वाट’ ; निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची तक्रार

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काम वेगात सुरू आहे. परंतु मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी ते भांबेवाडी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. काम सुरू पण अधिकारी , ठेकेदार जागेवर नसल्याचे दिसून येत होते.

हिंगणी निपाणी ते भांबेवाडी रस्त्यावर फक्त डांबर शिंपडले जात आहे. त्यावरच खडी टाकली जात आहे. परंतु नियमाप्रमाणे रस्ता स्वच्छ करून ठराविक मापाचे ,जाडीचे, रुंदीचे रस्ते तयार केले जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. याबाबत देविदास गायकवाड या ग्रामस्थाने याबाबत प्रत्यक्ष कामावर योग्य पद्धतीचे काम केलं जातं नसल्याची तक्रार व्यक्त केली आहे.

आज सोलापूरला जात असताना हिंगणी निपाणी ते भांबेवाडी रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे .कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.

या भागात अधिकारी वर्ग ठेकेदाराकडून काम करून घेत आहे असे कागदोपत्री सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात एकही अधिकारी कामावर हजर नाही डांबर केवळ टाकले जात असून त्यावर थोडी खडी अंथरले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते गाड्या जात असताना गाड्या घसरून पडत आहेत. कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी या ठिकाणी घेण्यात आली नाही.

बॅरिकेड्स, सुरक्षेसाठी लाल पट्ट्या, कोणत्याही प्रकारचे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत. काम सुरू रस्ता बंद बोर्ड नाही या ठिकाणी कोणते काम सुरू आहे .त्याचाही माहिती फलक नाही .जे काम सुरू आहे ते अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम सुरू आहे. या कामाची तपासणी करून यामध्ये जे दोषी असतील त्या ठेकेदारांवर कारवाई करावी तसेच अधिकारी कामावर येत नाहीत त्यांची ही चौकशी व्हावी अशा संदर्भाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देत आहे.
यावर लवकरात लवकर कारवाई न केल्यास हिंगणी निपाणी ते भांबेवाडी रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही गायकवाड यांनी विशेष प्रतिनिधीशी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here