मोबाईल चोरीच्या कारणावरून खून ;अक्कलकोट येथील दोन तरुण…

0
crime

सोलापूर दि :- उज्वल गोकुळ मडीखांबे वय:-25 रा.अक्कलकोट याचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेले धनंजय लालचंद मडीखांबे वय:- 26 व प्रिन्स उर्फ स्वामी शिवशरण शिंदे वय-28, दोघे राहणार भीम नगर,अक्कलकोट यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही. मोहिते यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, घटनेपूर्वी दोन दिवसाआधी यातील मयत उज्वल याने आरोपी धनंजय याचा मोबाईल चोरला होता, तो मोबाईल मयत उज्वल याने धनंजय याला परत देखील केला होता.याच कारणावरून मयत व आरोपींमध्ये दि:-4/1/2021 रोजी रात्री वाद झाला होता. तेव्हा दोन्ही आरोपींनी डोक्यात दगड व फरशी घालून उज्वल यास ठार मारले होते. अशा आशयाची फिर्याद पंचू पिरप्पा मडीखांबे याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली होती.त्यावरून दोघांना अटक झाली होती.

त्यावर दोघांनी ऍड.मिलिंद थोबडे यांच्यामार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. अर्जाच्या सुनावणी च्या वेळेस ऍड.मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात ,अर्जदारांविरुद्ध प्रत्यक्ष अथवा परिस्थितीजन्य पुरावा नसल्याने आरोपींनीच गुन्हा केला हे म्हणता येणार नाही तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी 30,000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
यात अर्जदार तर्फे ऍड.मिलिंद थोबडे,ऍड.अनिल मंगरुळे, ऍड.विनोद सूर्यवंशी तर सरकारतर्फे ऍड. डोके यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here