माढ्यात दोन तास टीव्ही, मोबाईल बंद 1 जानेवारीपासून अंमलबजावणी सुरु
फोन, टीव्हीच्या अतिरेक वापरामुळे ह्या उपक्रमाला सुरुवात – मीनलताई साठे
शेखर म्हेत्रे/ माढा प्रतिनिधी :
सध्याच्या काळात सर्वत्र टीव्ही आणि मोबाईलच्या अतिरेक वापरामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक व आरोग्याचे नुकसानाबरोबर आपल्या कुटुंबातील संवाद कमी होत असताना दिसत असल्याने माढा (Madha nagar panchayat ) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मीनल साठे (minal sathe ) आणि प्रियदर्शनी महिला बचत गटाच्या वतीने सायंकाळी 7 ते 9 याकाळात मोबाईल व टिव्ही बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या काळोपयोगी उपक्रमास खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय.
यासाठी शहरातील शैक्षणिक संस्थाच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरीच्या आयोजन करण्यात आले होते.या माध्यमातून शनिवारी प्रभावी जनजागृती करण्यात आली.विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने अनेक घोषवाक्य तयार करुन घोषणा देत रॅली काढली .
शहरातील सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद प्रशासलेसह जिल्हा परिषद शाळा नं.१ ‘ मुलींची शाळा ‘ माढा नं.२ साई पब्लिक स्कूल , मदर पब्लिक स्कूल, व्हिक्टरी इंग्लिश मिडीयम स्कूल, मातोश्री गोदावरी हरहरे आश्रमशाळा, सहकार महर्षी गणपतराव साठे विद्यालय यांचेसह सर्वच शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या सदस्या, नगरपंचायत पदाधिकारी, कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला.
यावेळी नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना या उपक्रमाची असलेली गरज सांगितली . याचबरोबर विद्यार्थी व पालक सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नगराध्यक्षा ॲड.मिनलताई साठे , उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे ,स.पो.नि. शाम बुआ, पाणी पुरवठा सभापती नितीन साठे, आरोग्य सभापती विकास साठे , नगरसेवक अजिनाथ माळी, नगरसेविका गितांजली देशमुख आदिंसह सर्व नगरसेवक नगरसेविका, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.