खळबळजनक : दूरदर्शनमध्ये ही ‘मी टू’ चे वादळ

१० महिला कर्मचाऱ्यांनी केला लैंगिक छळाचा आरोप

0

By–एम एच१३ न्यूज नेटवर्क

‘दूरदर्शन’ या देशातील सर्वात मोठ्या टीव्ही नेटवर्किंग संस्थेतील दहा महिलांनी आपले लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. यामुळे सर्व मीडियामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय संस्थेने दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे दहापैकी नऊ प्रकरणात संस्थेअंतर्गत लैंगिक तक्रार निवारण समितीने न्याय केला नाही अशी धक्कादायक माहिती पीडित महिलांच्या वकील वरूणा भंडारी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाचे प्रकार एकामागून एक घडत असल्याने देशात खळबळ सुरू झाली असून यामुळे बऱ्याच बड्या लोकांची नावे समोर आली आहेत. दूरदर्शन मधील महिलांनी यांचे अनुभव माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की आम्ही आमचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार लैंगिक शोषण विरुद्ध समितीला केली परंतु त्यानंतर या समितीने घटनेची चौकशी करून अहवाल वरिष्ठां पुढे मांडला परंतु त्यांनी दखल घेतली नाही. लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनी आम्हाला धमकावले असून आमच्या जीवाला धोका असल्याचे ही म्हणाले आहे.सन 2015साली या लैंगिक शोषणाबद्दल समितीने निलंबनाचे आदेश देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे निलंबन केले नाही.

लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या महिला पैकी तीन महिला या कंत्राटी पद्धतीने दूरदर्शनमध्ये कामावर आहेत. त्यांनी या छळा बद्दल अधिक माहिती दिली नाही. त्यापैकी एका महिलेने तक्रार केली म्हणून त्यांचा सात महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here